आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याच्या जामिनावर गुरुवारी सुनावणी झाली होती ,मात्र त्यावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला असून त्याची सुनावणी 20 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
म्हणूनच सध्या आर्यन ऑर्थर रोड कारागृहात दिवस काढतो आहे.
काल विजयादशमी निमित्त आर्यन ने ऑर्थर रोड कारागृहातून त्याच्या कुटुंबीयांना व्हिडिओ कॉल केला होता.
व्हिडिओ कॉल द्वारे आर्यनने जवळपास दहा मिनिटे आई-वडिलांची संवाद साधला.
तब्बल १२ दिवसानंतर त्याला शाहरुख खान आणि गौरी सोबत संवाद साधता आला.
आर्यनला पाहून गौरी आणि शाहरुख खान ला खूपच वाईट वाटू लागले आणि त्यांचे अश्रू अनावर झाले होते. आर्यन सुद्धा भावुक होऊन रडू लागला होता.
टाइम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या वृत्तानुसार, तुरुंगातील एका अधिकाऱ्याने माहिती दिली की ,आर्यन ने त्याच्या आईचा फोन नंबर दिला आणि व्हिडिओ कॉल केला होता. जवळजवळ १० मिनिटे हा भावुक संवाद सुरू होता.
आर्थर रोड जेल मधील व्हिडिओ कॉल ची सुविधा कोविड -१९ च्या काळात सुरू करण्यात आली होती. या सुविधेमुळे कैद्यांना त्यांचे वकील आणि कुटुंबियांशी संवाद साधता येत होते.
गेल्या आठवड्यापासून आर्यनला जनरल कोठडीत ठेवण्यात आले आहे. आर्यन खानचा अंडर ट्रायल नंबर एन ९५६ असा आहे.
इतर सर्वसाधारण कैद्याप्रमाणे आर्यनलाही वागणूक दिली जात आहे .कारागृहात आर्यनला घरच्यांकडून ४५०० रुपयांची मनी ऑर्डर झाली होती.
त्यातूनच आर्यनला हव्या त्या वस्तू कारागृहातील कॅन्टीन मधून विकत घेता येते.आर्यन ला कारागृहातुन जेवण दिले जाते परंतु हे जेवण त्याला आवडत नसल्याने तो फक्त बिस्किट खाऊन पोट भरतो.
जवळपास बारा दिवसांनी आर्यनने त्याच्या कुटुंबियांशी बोलला.


