मित्रांनो ! आपली हिंदूंची संस्कृती फार जुनी आहे. आपल्या हिंदू संस्कृती वर विश्वास ठेवून आपण अनेक सण साजरा करतो. आपल्या भारत देशामध्ये दसरा, गुढीपाडवा, दिवाळी असे अनेक सण लोकं मोठ्या उत्साहात , आनंदाने साजरा करतात. दसरा(Dussehra) हा सगळ्यात मोठा सण म्हणून ओळखला जातो. पण ही विजयादशमी(Vijayadashami 2021) साजरी करतो यापाठीमागचे कारण काय आहे हे आपण जाणून घेऊ.
Dussehra Images 2021
अनेक वर्षापूर्वी पृथ्वी तलावरती महिषासुर नावाचा राक्षसाने जन्म घेतला होता. जेव्हा तो राक्षस जन्मला तेव्हा तो म्हशीच्या रूपामध्ये होता. तिन्ही लोकांच्यावर मी वर्चस्व मिळविणार हे त्याचे महत्वाकांक्षा होते. आकाश पाताळ स्वर्ग देव दानव माणूस या सगळ्यांच्यावर मी वर्चस्व मिळवणारच असे त्याने ठरवले होते. त्यासाठी तो जंगलात गेला आणि मोठी तपश्चर्या चालू केली. बारा वर्षे त्याने अन्नपाणी सुद्धा घेतलं नाही. उन, वारा, पाऊस झेलून त्याने कधीही तपश्चर्येत खंड पडू दिला नाही. ब्रह्मदेव हे त्याच्या तपश्चर्य पाहून एक दिवस प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर राक्षसाला काय हवे ते मागण्यास सांगितले. राक्षसी वृत्ती असणारा हा राक्षस नेहमीच स्वार्थी असल्याने तो त्यांना युक्ती करून एक वरदान मागितला. कोणताही देव-दानव माणूस, राक्षस त्याला कधीही मारू शकणार नाहीत, अशी इच्छा व्यक्त केला. ब्रह्मदेवाने त्याला तथास्तु म्हणून हे वरदान त्याला सोपवले.
नंतर ही ताकद प्राप्त झाल्यामुळे तो पृथ्वीतलावर येऊन हाहाकार माजवला. साधू ,ऋषी, मुनी ,माणूस यांना त्रास देण्यास सुरुवात केला. यज्ञात खंड पाडून त्याने सर्व देवांवर सुद्धा आक्रमण करण्यास सुरुवात केला होता. देव सुद्धा मारू शकत नाही असा वरदान प्राप्त झाल्यामुळे सर्व देवांना आता काळजी वाटू लागली होती.
या संकटाचा विचार करून सर्व देवांची एक सभा भरवली होती. महिषासुर राक्षसचे आता काय करावे असा प्रश्न सर्वांनाच पडला होते. राक्षसाला मारायचे तर कसे असा गोंधळ सगळ्यांचा झाला होता. यावर उपाय म्हणून सर्व देवांनी मिळून आदिमाया शक्तीला साकडं घातलं. ही आदिमाया देवीच या राक्षसाचा नाश करू शकते हे सर्व देवांना माहीत होते. म्हणूनच आदिमाया देवीच्या रूपामध्ये श्री माता दुर्गा देवी प्रकट झाली. सर्व देवांनी मिळून तिला शक्ती दिले. विष्णू देवांनी त्यांचे सुदर्शन चक्र दिले. श्री भगवान महादेवांनी दुर्गा मातेला त्यांचे प्रिय त्रिशूल दिले. इंद्राने तिला एक खड्गस्त्र प्रदान केले. अठरा भुजाचे रूप धारण करून श्री दुर्गा माता पृथ्वीवर प्रकट झाली.
त्यावेळी फार मोठे युद्ध झाले होते. हे युद्ध जवळपास नऊ दिवस चालले होते . शेवटच्या नवव्या दिवशी श्री दुर्गा मातेने महिषासुर राक्षसाचा वध करून सर्वांना संकटातून बाहेर काढले.
त्यानंतर सर्व देवांनी फुले उधळून श्री दुर्गा मातेचे कौतुक केले. म्हणूनच महिषासुराचा वध करुन श्री दुर्गा मातेने विजय प्राप्त केला म्हणूनच हा दहावा दिवस विजयादशमी अर्थात दसरा म्हणून साजरा केला जातो.
अशाप्रकारे श्री दुर्गा मातेने या राक्षसाचा वध करून आपल्या सर्वांना सुखी करण्यास खूप मोठे युद्ध करून सर्वांना संकट मुक्त केले होते. याचीच जाणीव ठेवून आपण या आदिमाया शक्तीचे दरवर्षी यथाशक्तिने, भक्तीने नऊ दिवस पूजा करतो आणि दहाव्या दिवशी सर्वांना आपट्याची पाने म्हणजेच सोने वाटून दसऱ्याच्या शुभेच्छा देतो. यातूनच पुन्हा एकदा आपल्या मध्ये पॉझिटिव्ह एनर्जी पास होऊन आपण आनंदी राहू शकतो.
मित्रांनो !आपण दसरा हा सण साजरा करण्यामागचे कारण समजून घेतलं. वेगवेगळ्या राज्यात या सणाला वेगवेगळी नावे दिली आहेत. संपूर्ण भारत vijaya dashami या सणाचा मन भरून आनंद घेतो.


