आपल्याकडे आता सामान्यपणे 25 हजार रुपयांमध्ये चांगले मोबाईल फोन येत आहेत. यामध्ये सॅमसंग, वनप्लस, रियलमी, रेडमी यासारखे मोबाईल आहेत. मात्र अलीकडे iQoo, Vivo, मोटोरोला यासारख्या कंपन्या देखील नवे मोबाईल्स लॉन्च केले आहेत. Best Mobiles/ phone under 25000 in india 2021 List आज या ब्लॉग मध्ये पाहुयात.
Best Mobiles Under 25000 Rs
| Motorola Edge 20 Fusion |
|---|
| किंमत पहा |
Motorola Edge 20 Fusion हा मोबाईल 6.7 इंच OLED display सोबत येत असून या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. मोटोरोला एज 20 फुजनची मुख्य गोष्ट म्हणजे या स्मार्टफोनला साईडला फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. आणि या स्मार्टफोनमध्ये डेडिकेटेड गुगल असिस्टंट बटन देण्यात आले आहे. तर हा स्मार्टफोन IP52 rating सहित येतो. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला स्टॉक अँड्रॉइड UI वापरायला मिळते. मात्र या स्मार्टफोनबद्दल एक तक्रार असून ती म्हणजे कमी प्रकाशात या स्मार्टफोनचा कॅमेरा चागले फोटो काढू शकत नाही. Edge 20 Fusion या स्मार्टफोनची बिल्ट कोलिटी चांगली असून हा स्मार्टफोन परफॉर्मन्स देखील चांगला देतो. सोबत या स्मार्टफोनची बॅटरी लाईफ सुद्धा चांगली आहे. Motorolaच्या या स्मार्टफोनसाठी OnePlus Nord CE 5G पेक्षा Rs. 2,000 कमी किंमत मोजावी लागत आहे.
या स्मार्टफोनमद्धे 6GB रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आला आहे. तर याची बॅटरी 5000mAh ची आहे. रियर कॅमेरा बद्दल बोलायचं तर यात आपल्याला 108-megapixel + 8-megapixel + 2-megapixel असा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो.
| OnePlus Nord CE 5G |
|---|
| किंमत पहा |
2021 मध्ये गाजलेल्या स्मार्टफोनपैकी हा स्मार्टफोन आहे. OnePlus Nord CE 5G हा फोन smooth OxygenOS UI सोबत येत असून कमी किंमतीत येणारा वनप्लसच्या स्मार्टफोनपैकी एक आहे. हा स्मार्टफोन काही premium "flagship killer" स्मार्टफोन नसला तरी पण प्रीमियम स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनसोबत स्पर्धा करतो त्यामुळे बऱ्याच युजर्सना हा स्मार्टफोन आवडला आहे. OnePlus Nord CE 5G स्मार्टफोनमध्ये Snapdragon 750G SoC प्रोसेसर मिळतो. या स्मार्टफोनची स्क्रीन 6.43-inch Super Amoled screen आहे. या स्मार्टफोनमध्ये 4500mAh battery मिळत असून हा स्मार्टफोन quick chargingला सपोर्ट करतो त्यामुळे आपला अनुभव या स्मार्टफोनविषयी चांगला बनतो. या सर्व स्पेसिफिकेशनमुळे हा स्मार्टफोन आपल्या रोजच्या कामासाठी तसच गेम्स खेळण्यासाठी चांगला आहे.
OnePlus Nord CE 5G चा बेस वेरीएन्ट 6GB RAM आणि 128GB इनबिल्ट स्टोरेजसहित येतो मात्र हा व्हेरियंट अजून विक्री साठी उपलब्ध नाहीय. मात्र याच्या पुढील व्हेरियंट जो 8GB RAM आणि 128GB स्टोरेज सहित आहे तो आपल्या बजेट बसतो. आणि OnePlus Nord CE 5G चा टॉप व्हेरियंट 12GB RAM आणि 256GB storage सहित येतो. या स्मार्टफोनचा रियर कॅमेरा ट्रिपल सेटअप असून ते 64-megapixel + 8-megapixel + 2-megapixel आहेत. तर फ्रंटला सेल्फीसाठी 16-megapixelचा कॅमेरा मिळतो.
| Samsung Galaxy F62 |
|---|
| किंमत पहा |
Samsung Galaxy F62 हा सॅमसंगचा नवा स्मार्टफोन फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबाबतीत जवळपास Samsung Galaxy M51 सारखाच असून हा स्मार्टफोन अधिक शक्तिशाली आहे. सोबत या स्मार्टफोन flagship-class SoC आहे आणि महत्वाच म्हणजे या स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट अँड्रॉइड os आहे. सॅमसंगच्या Galaxy F62 मध्ये 7,000mAh battery बॅटरी येते त्यामुळे मोबाईल जरा वजनदार वाटतो. मात्र या स्मार्टफोनचा डिस्प्ले Super AMOLED display आहे. सोबत हा स्मार्टफोन दिवसप्रकाशात चांगले फोटो काढू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे गेम खेळताना या स्मार्टफोनचा परफॉर्मन्स चांगला आहे कारण या स्मार्टफोनमध्ये आपल्याला Exynos 9825 SoC हा सॅमसंगचा प्रोसेसर मिळतो जो Galaxy Note 10+ मध्ये वापरण्यात आला आहे.
Samsung Galaxy F62 हा स्मार्टफोन 25W fast charger सोबत येतो. या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा 32-megapixel असून मागील रियर कॅमेरा 64-megapixel + 12-megapixel + 5-megapixel + 5-megapixel असे येतात.
| Mi 10i |
|---|
| किंमत पहा |
Xiaomiने 2021 मध्येच Mi 10i या स्मार्टफोनला लॉन्च केले असून हा सुरवातीला Rs. 20,999 इतक्या रुपयात विकला जात होता. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 750G 5G SoC प्रोसेसर मिळत आहे. सोबत हा स्मार्टफोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. याचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसोबत येतो. Mi 10i हा स्मार्टफोनमध्ये 108-megapixel प्राथमिक कॅमेरा असून हा इतर इतक्या किंमतीत येणाऱ्या स्मार्टफोनपेक्षा इम्प्रेसिव्ह आहे.
एमआय 10आय च्या कॅमेरा संदर्भात बोलायचं तर यात
फ्रंटला 16-megapixel आहे तर मागील साईडला कॉड कॅमेरा सेटअप देण्यात आलं असून हे कॅमेरे 108-megapixel + 8-megapixel + 2-megapixel + 2-megapixel आहेत. तर डिस्प्ले 6.67 इंच आहे.
| Vivo V20 |
|---|
| किंमत पहा |
Vivo V20 हा स्मार्टफोन या यादीतील शेवटचा स्मार्टफोन असला तरी येथेच ही लिस्ट संपत नाही आम्ही नवनवीन अपडेट्स आमच्या जीवन मराठी डॉट कॉम द्वारे आणत असतो त्यामुळे जीवन मराठीला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, शेअरचॅट, कू येथे फॉलो करा. वरील बाजूस लिंक देण्यात आली आहे. Vivo V20 हा स्मार्टफोन नवीन रंगात आलेला आहे. याची जाडी केवळ 7.38mm आहे. या स्मार्टफोनच्या नव्या डिजाईनमुळे V20 हा फोन आपल्याला भावू शकतो. V20 हा विवोचा स्मार्टफोन 6.44-inch AMOLED display सहित येतो आणि महत्वाचं म्हणजे हा स्मार्टफोन in-display fingerprint sensor सहित येतो. मोबाईलच्या वरील बाजूस असलेलं dewdrop notch मुळे मोबाईल खुलून दिसतो.
Vivo V20 मध्ये आपल्याला मागील बाजूस triple camera setup देण्यात आलं असून यातील मुख्य कॅमेरा 64-megapixel आहे. दुसरा कॅमेरा 8-megapixel ultra-wide आहे जो माँक्रो शॉट्स देखील घेऊ शकतो तर तिसरा कॅमेरा हा 2-megapixelचा mono camera आहे. या स्मार्टफोनमध्ये फ्रंटला सेल्फीसाठी 44-megapixel सेल्फी कॅमेरा असून तो Eye Autofocus आहे. Vivo V20 हा Qualcomm Snapdragon 720G प्रोसेसर सहित येतो जो 8GB RAM सहित येतो. यामध्ये अलीकडील Funtouch OS येतो जो Android 11 आधारित आहे.


