महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात गाजलेला आणि सर्वांचा लाडका 'चला हवा येऊ द्या 'हा कार्यक्रम झी मराठी ने सादर करून प्रेक्षकांना जवळ केले आहे.
कॉमेडी हा या कार्यक्रमाचा मूळ पाया असून ते प्रेक्षकांना अगदीच वेडे केले आहे.उत्तम प्रतिसाद मिळालेल्या 'चला हवा येऊ द्या' ला चाहत्यांनी खूपच प्रेम दिले आहे.
या कार्यक्रमाचे होस्टिंग करणारे अभिनेता डॉ. निलेश साबळे हा सर्वांचा फेवरेट कलाकार म्हणून ओळखला जातो.' हसताय ना हसायलाच पाहिजे' म्हणत डॉक्टर निलेश साबळे ने कार्यक्रमाची नेहमीच टापटीप जबाबदारी पार पाडतो. उत्कृष्ट सूत्रसंचालन, विनोदी वृत्ती आणि रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे उत्तम गुण त्याच्याकडे आहे.
पण आपण आता त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेऊ...
निलेशच्या पर्सनल लाईफ बद्दल चाहत्यांना जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. अभिनेता डॉक्टर निलेश साबळे हा चाहत्यांचा खूपच लाडका कलाकार आहे.विनोदी वृत्ती आणि सेन्स ऑफ ह्युमर च्या जोरावर त्याने सर्वांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
चला हवा येऊ द्या कार्यक्रमांमध्ये त्याने टीमचं नेतृत्व करत एक यशस्वी गाथा लिहिली आहे. निलेश साबळे ने 'महाराष्ट्राचा सुपर स्टार 'या कार्यक्रमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. मात्र चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून त्याला त्याची खरी ओळख मिळाली. निलेश साठी हा प्रवास खूपच खडतर होता. डॉक्टर ची पदवी घेऊनही निलेशने अभिनयाच्या आवडीसाठी या क्षेत्रात पदार्पण केले. यामध्ये त्याला त्याच्या कुटुंबीयांची आणि पत्नी गौरी ची खूप मोठी साथ मिळाली आहे.
निलेश सोशल मीडियावर फारसा सक्रीय नसतो त्यामुळे त्याचे व त्याच्या कुटुंबीयांचे फोटो सुद्धा जास्त पाहण्यास मिळत नाहीत किंवा त्याच्या अपडेट सुद्धा आपल्यांना मिळू शकत नाही.
मात्र एक गोष्ट फार आश्चर्यकारक आहे.
ती म्हणजे निलेश आणि त्याच्या पत्नीची लव्ह स्टोरी. यांची स्टोरी फिल्मी आहे. या दोघांची ओळख कॉलेजमध्ये झाली होती. ते दोघे वेगवेगळ्या कॉलेजमध्ये होते मात्र एका कार्यक्रमानिमित्त निलेश गौरीच्या कॉलेजमध्ये गेला होता.
तेव्हा यांची पहिली भेट झाली होती आणि मैत्री सुद्धा झाली. हे दोघे एकमेकांचे खास मित्र बनले. कालांतराने या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी लग्न सुद्धा केलं.
आता या दोघांच्या संसाराला जवळजवळ ११-१२ वर्षे झाली आहे. नात्याच्या सुरुवातीलाच निलेशने गौरीला स्पष्ट सांगितलं होतं की, त्याला वैद्यकीय क्षेत्रात अजिबात रस नाही .त्याला अभिनयाचं वेड आहे.त्यानंतर गौरीने त्याला प्रत्येक निर्णयात साथ देण्याची कबुली दिली होती. गौरीने हे वचन पाळले देखील आहे. गौरी दिसायलाही एखाद्या अभिनेत्री पेक्षा कमी नाही.


