Nokia G300 हा मोबाईल 12 ऑक्टोबर 2021 रोजी लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन 6.52 इंच टच स्क्रीन डिस्प्ले सोबत येतो याचा रिझोल्युशन 720x1600 पिक्सेल आहे. तर या स्मार्टफोनचा अस्पेक्ट रेशीओ 20:9 आहे. Nokia G300 हा octa-core Qualcomm Snapdragon 480 प्रोसेसर सोबत येतो. तर या स्मार्टफोनमध्ये 4GB ची RAM मिळते.
Nokia G300 हा स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टीमवर येतो तर यामध्ये येणारी बॅटरी 4470mAh आहे. Nokia G300 हा स्मार्टफोन Quick Charge 3.0 या फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.
NOKIA G300 Camera
या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास Nokia G300 स्मार्टफोनमध्ये आपल्याला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असून 16-megapixel चा प्रायमरी लेन्स मिळतो तर याचा अपरेचर f/1.8 आहे. दुसरा कॅमेरा 5-megapixel चा असून तो f/2.2 अपरेचर सहित येतो, तिसरा कॅमेरा 2-megapixel चा असून f/2.4 अपरेचर आहे. हा रियर कॅमेरा ऑटोफोकसला सपोर्ट करतो. पुढील बाजूस 1 कॅमेरा देण्यात आलं असून तो 8-megapixel चा आहे. हा कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओचॅट करण्यास उपयुक्त आहे.
Nokia G300 हा Android 11 OS सहित येतो तर या स्मार्टफोनमध्ये 64GB इनबिल्ट स्टोरेज देण्यात येत आहे. हा स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येतो. या Nokia G300 उंची, रुंदी, आणि जाडी अनुक्रमे 169.41 x 78.43 x 9.28mm आहेत. हा स्मार्टफोन सध्या Meteor Grey रंगात लॉन्च करण्यात आला आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी नोकियाच्या या नवीन फोन मध्ये Wi-Fi 802.11 b/g/n/ac, GPS, Bluetooth v5.00, NFC, and USB Type-C हे फीचर्स देण्यात आले आहेत. सेन्सर पाहिल्यास accelerometer, ambient light sensor, proximity sensor, आणि fingerprint sensor देण्यात आले आहेत.
NOKIA G300 SPECIFICATIONS
ट्रिपल लेन्स कॅमेरा
नोकिया जी तीनशे मध्ये ट्रिपल लेन्स कॅमेरा सेटअप देण्यात आला असून stunning फोटोज काढण्यासाठी 16 MPचा मुख्य कॅमेरा आहे तर 5 MP अल्ट्रावाईड लेन्स असून तिसरा कॅमेरा 2 MP डेपथ लेन्स आहे.
5G कनेक्टिव्हिटी
हा स्मार्टफोन येणाऱ्या काळाला अनुरूप असून येत्या 5G नेटवर्कसाठी हा स्मार्टफोन बनवण्यात आला आहे.
Android चा लेटेस्ट OS
नोकिया जी३०० हा स्मार्टफोन Android™ 11 ऑपरेटिंग सिस्टीमसहित येतो.
पॉवरफुल परफॉर्मन्स
नोकियाच्या या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 4350 प्रोसेसर येतो जो आपल्याला अडथळ्यांशिवाय मोबाईल वापरायला मदत करतो.


