Amazon

Ads Area

header ads
header ads

'आई कुठे काय करते' ही मालिका निरोप घेणार का? हे आहे खरं कारण. | Aai Kuthe ky krte | Star Pravah.

 स्टार प्रवाह वरील अवघ्याचं दिवसात लोकप्रिय ठरलेली मालिका 'आई कुठे काय करते' हे प्रेक्षकांची फारच आवडती आहे. या मालिकेमुळे  चॅनलचा टीआरपी वाढला . नवनवीन ट्विस्ट आणि मालिकेचे वळण प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यास नेहमीच अग्रगण्य ठरतात.

आई कुठे काय करते या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच स्थान निर्माण केल्याने प्रेक्षकही त्यांना भरगोस प्रतिसाद देतात.

पण मालिका आता चाहत्यांचा निरोप घेणार कि काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे हा संभ्रम नेटकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.


मालिकेशी संबंधित एक फोटो व्हायरल झाला आहे .यात अनिरुद्ध आणि अरुंधती यांचे म्हातारे झालेले चेहरे फोटोमध्ये दाखवण्यात आले आहे. ते एकत्र येऊन म्हातारपणी ही एकमेकांकडे पाहून गोड हसत आहे. या फोटोमुळे नेटकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण होऊन हा चर्चेचा विषय ठरला आहे. आई कुठे काय करते मालिका लगेच संपणार का? आता अचानक असा निर्णय कसा घेतला, संजना कुठे गेली, मालिकेचा शेवट काय? असे अनेक प्रश्न चाहत्यांकडून विचारण्यात येत आहे. आणि हा विषय मालिका संपणार का? येथवर पोहोचला आहे.

पण हे आहे सत्य....

मालिकेत ईशा ची भूमिका साकारणारी कलाकार अपूर्वा गोरे हिच्या चाहत्याने एका कमेंट द्वारे या फोटोचा  खरा  अर्थ स्पष्ट करून नेटकर्यांचा  गोंधळ दूर केला आहे.


या युजरने कमेंट करत म्हटलं की, " मालिका आत्ताच संपणार नाही. हा फोटो अरुंधती आणि अनिरुद्ध च्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर अरुंधतीने पाहिलेल्या स्वप्नातील आहे. अनिरुद्ध आणि अरुंधती च्या लग्नात पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यावर मालिकेत त्यांचा पुन्हा एकदा लग्न झालेले दाखवण्यात आलं होतं त्या वेळेस अरुंधतीने पाहीलेल्या स्वप्नात तिने हे चित्र पाहिलं होतं कमेंट नंतर अनेक नेटकर यांनी सुटकेचा श्वास घेतला आपली आवडती मालिका संपणार की काय हा गोंधळ नाहीसा झाल्याने आता  चाहते आनंदात आहेत.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या