मुख्य म्हणजे OnePlus 9RT या स्मार्टफोनला मागील साईडला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलं असून त्यात 50 मेगापिक्सल चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर या स्मार्टफोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट देणारा AMOLED डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये आपल्याला octa-core Qualcomm Snapdragon 888 SoC प्रोसेसर मिळत आहे.
OnePlus 9RT सोबत आज OnePlus मोबाईल कंपनीने लाईव्ह इव्हेंटमध्ये OnePlus Buds Z2ला सुद्धा लॉन्च केले. हा नवीन trule wireless stereo (TWS) इअरबड असून तो active noise cancellation (ANC) सपोर्ट सहित येतो. मुख्य म्हणजे यात 11mm drivers देण्यात आले आहेत. हा मॉडेल OnePlus Buds Z इअरबडच्या पुढील मॉडेल असणार आहे.
OnePlus 9RT price in India, availability
OnePlus 9RTची सध्या चायनामधील किंमत समोर आली असून 8GB RAM + 128GB storage variant साठी याची किंमत CNY 3,299 (सुमारे ₹ 38,600) ठेवण्यात आली आहे. तर 8GB + 256GB साठी CNY 3,499 (सुमारे ₹ 40,900) किंमत ठेवल्याची माहिती ऑनलाईन माध्यमातून मिळत आहे. हा स्मार्टफोन 12GB + 256GB वेरीएन्ट मध्ये सुद्धा उपलब्ध होणार असून याची किंमत CNY 3,799 (₹ 44,400) ठेवण्यात आली आहे. OnePlus 9RT हा फोन 19 ऑक्टोबर पासून चायनात सेल साठी उपलब्ध होणार असून पहिल्या दिवशी हा स्मार्टफोन घेतल्यास CNY 100 (सुमारे ₹ 1,200) सूट मिळणार आहे.
वनप्लसचे इतर मोबाईल्स आणि किंमत
OnePlus Nord 2 5G (Blue Haze, 8GB RAM, 128GB Storage)
OnePlus 9R 5G (Lake Blue, 8GB RAM, 128GB Storage)
OnePlus Buds Z2 price in India, Availability
OnePlus Buds Z2 च्या किमतीबद्दल सांगू इच्छितो की, या बड्सची किंमत CNY 499 (सुमारे ₹5,800) ठेवण्यात आली आहे. तर हे earbuds चीन मध्ये 19 ऑक्टोबर पासून उपलब्ध होणार आहेत. पहिल्या दिवशी खरेदी केल्यास OnePlus Buds Z2 वर CNY 100 सूट मिळणार आहे.
दोन्ही OnePlus 9RT आणि OnePlus Buds Z2 बुधवारपासून प्रीऑर्डरसाठी चीन मध्ये उपलब्ध होणार आहेत.
तर यांच्या भारतातील लॉन्चबद्दल बोलायचं तर, OnePlus 9RT आणि OnePlus Buds Z2 या दोन्ही वस्तूंच्या लॉन्चबद्दल अजून काही माहिती मिळाली नाही. मात्र OnePlus ला हे प्रॉडक्ट्स 2021 जागतिक बाजारपेठेत 10 million सेल्स करायचे आहेत.
OnePlus 9RT Specifications
OnePlus 9RT हा स्मार्टफोन dual-SIM (Nano) असून Android 11 ऑपरेटिंग सिस्टीमसोबत येतो. हा स्मार्टफोन Oppoच्या ColorOS UI आधारित येतो.
वनप्लसच्या या मॉडेलला 6.62 इंचाची स्क्रिन देण्यात आली असून ती full-HD+ आहे आणि तिचा रिझोल्युशन 1,080x2,400 पिक्सेल आहे. हा डिस्प्ले Samsung E4 AMOLED display असून तो 20:9 aspect ratio सोबत येतो. तर 120Hz याचा refresh rate आहे.
OnePlus 9RT या स्मार्टफोनला octa-core Qualcomm Snapdragon 888 SoC प्रोसेसर असून तो 12GB LPDDR5 RAM सोबत येतो. तर यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 कॅमेरा लेन्स आहे. हा कॅमेरा लेन्स OnePlus 9, OnePlus 9 Pro, आणि OnePlus Nord 2 या मोबाईलमध्येसुद्धा वापरण्यात आले आहेत. तर हा वनप्लस 9R मध्ये वापरण्यात आलेल्या 48-megapixel Sony IMX586 primary sensor चा अपग्रेड आहे. हा मुख्य सेन्सर f/1.8 लेन्स असून optical image stabilisation (OIS) साठी उपयुक्त आहे.
OnePlus 9RT Camera Specs
OnePlus 9RT मध्ये मुख्य कॅमेरा 50-megapixel च मिळत असून दुसरा कॅमेरा 16-megapixel चा आहे जो f/2.2 अल्ट्रावाईड लेन्स आहे. आणि तिसरा कॅमेरा 2-megapixel चा मायक्रो शॉट घेणारा लेन्स आहे. सोबत यात आपल्याला dual-LED flash मिळत आहे. हा मागील कॅमेरा 4K video recording करण्यास उपयुक्त आहे.
सेल्फी आणि विडिओ चॅट करण्यासाठी OnePlus 9RT मोबाईल मध्ये 16-megapixel Sony IMX471 सेल्फी कॅमेरा फ्रंटला देण्यात आला आहे. या कॅमेरामध्ये इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलाजेशन उपलब्ध आहे.
OnePlus 9RT स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटी ऑप्शनबद्दल सांगायचं तर इतर स्मार्टफोनप्रमाणे 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.2, GPS/ A-GPS, NFC, and a USB Type-C port देण्यात आला आहे. तर सेन्सरच्या बाबतीत accelerometer, ambient light sensor, gyroscope, magnetometer, and a proximity sensor इतके सेन्सर देण्यात आले आहेत.
OnePlusने OnePlus 9RT या स्मार्टफोनमध्ये dual stereo speakers दिले असून हे Dolby Atmos ला सपोर्ट करतात. या स्मार्टफोनची बॅटरी क्षमता 4,500mAh असून यात dual-cell battery आहे. आणि हा स्मार्टफोन 65T Warp Charge फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. याच्या लांबी, रुंदी, जाडी बद्दल सांगायचं तर हा अनुक्रमे 162.2x74.6x8.29mmमध्ये येतो. तर या स्मार्टफोनच वजन 198.5 ग्रॅम आहे.


