बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान याच्या मुलाला क्रूज शिप वर ड्रग्स पार्टीत पोलिसांनी अटक केले होते. सध्या कोर्टात या केसबद्दल खरीखोटी करण्यात येत आहे. अमलीपदार्थ प्रकरणात आरोपी आर्यन खान आणि इतर आरोपीना जामीन मिळावा यासाठी आरोपींच्या वकिलांकडून जोरदार प्रयत्न सुरू असले तरी अमली पदार्थ विरोधी विभागाकडून आरोपींना जामीन कसा मिळणार नाही यासाठी न्यायालयात जोरदार बाजू मांडली जात आहे.
आज न्यायालयात सुनावणी सुरू असून एसीबीतर्फे जोरदार युक्तीवाद करण्यात येत आहे.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात शोविक चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर निर्णय देताना एनडीपीएस कायद्यातील सर्व गुन्हे हे अजामीनपात्र असल्याचे मुंबई हायकोर्टाने नमूद केले आहे. या प्रकरणात देखील अनेक आरोपींकडून अमलीपदार्थ हस्तगत केले.
या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. हे पाहता कोणत्याही आरोपीला जामीन देणे योग्य होणार नाही, असा युक्तीवाद एनसीबीचे वकील अनिल सिंग यांनी आज कोर्टात केला.
न्यायालयात युक्तीवाद करताना एनसीबीचे वकील अनिल सिंग म्हणाले की, आर्यन खान हा प्रथमच अमलीपदार्थ सेवन करणारा आहे असे नसून तो नियमित अमलीपदार्थ सेवन करणारा आहे असे प्रथमदर्शनी पुराव्यांतून दिसत आहे. छाप्यादरम्यान आरोपी अरबाझ मर्चंटकडून चरस हस्तगत झाले असून ते दोघांसाठी होते, असे अरबाझने दिलेल्या जबाबातून स्पष्ट होत आहे.


