Amazon

Ads Area

header ads
header ads

सिक्कीमच्या नाथू ला सीमा भागात हिमस्खलन, 7 मृत्यू तर 22 पर्यटकांना वाचवण्यात यश

Massive avalanche in Nathu La, Sikkim: सिक्कीममधील नाथू ला सीमा भागात मंगळवारी (४ एप्रिल) मोठा हिमस्खलन झाला. घडलेल्या घटनेमध्ये 11 जण जखमी झाले असून 7 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. जवळपास 80 पर्यटक अडकल्याची भीती आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
A massive avalanche hit the Nathu La  area in Sikkim on Tuesday (April 4). 11 people were injured and 7 tourists died in the incident.

हिमस्खलनानंतर गंगटोक ते नाथूला जोडणाऱ्या 15व्या मैल जवाहरलाल नेहरू रोडवर बचावकार्य (Rescue work on Jawaharlal Nehru Road) सुरू आहे. बर्फामध्ये अडकलेल्या 22 पर्यटकांची सुटका करण्यात आली. त्यांना गंगटोक येथील Central Referral Hospital आणि STNM Hospital मध्ये दाखल करण्यात आले आहे. रस्ता मोकळा करण्यात आला असून अडकलेल्या 80 वाहनांची आणि 350 पर्यटकांची सुटका करण्यामध्ये आली.

भारत-चीन सीमेजवळ नाथू ला (Nathu La near India-China border) या उंच पर्वतीय खिंडीजवळ हे हिमस्खलन दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास झाला. तिथे हिल पास समुद्रसपाटीपासून 4,310 मीटर (14,140 फूट) उंचीवर असून एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.

तेथील चेकपोस्टचे महानिरीक्षक सोनम तेनझिंग भुतिया यांनी सांगितले की, येथे पास केवळ 13व्या मैलासाठी जारी केले जातात, परंतु पर्यटक परवानगीशिवाय 15व्या मैलाच्या पुढे जात आहेत. आज घडलेली घटना 15 व्या मैलावर घडली. सध्या सिक्कीम पोलीस, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ सिक्कीम, पर्यटन विभागाचे अधिकारी आणि वाहन चालकांकडून बचावकार्य सुरू आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या