Amazon

Ads Area

header ads
header ads

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन | Greetings on the birth anniversary of Yashwantrao Chavan

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
Former Chief Minister Prithviraj Chavan paid tribute to Yashwantrao Chavan on his birth anniversary.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज त्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

याप्रसंगी विधीमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव श्री. राजेंद्र भागवत तसेच विधिमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

देशाचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजभवनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

विद्यमान खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, भावना गवळी, आमदार सदा सरवणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनात अभिवादन
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीतील दोन्ही महाराष्ट्र सदनात अभिवादन करण्यात आले.

कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदन सभागृहात प्रभारी निवासी आयुक्त व अतिरिक्त निवासी आयुक्त निवा जैन यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस व कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदन येथील त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राजेश अडपवार यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या