Amazon

Ads Area

header ads
header ads

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 59 वा दीक्षांत समारंभ : 'या' उमेदवारांना मिळणार पदवीचे सर्टिफिकेट उद्या | Shivaji University, Kolhapur 59th Convocation

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठाचा ५९ का दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशिय सभागृहात बुधवार दि. २९ मार्च २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता संपन्न होणार आहे.
The 59th convocation ceremony of Shivaji University Kolhapur was held in Rajmata Jijausaheb multi-purpose hall of the university on Wednesday. It will be concluded on 29 March 2023 at 12.00 PM.

या Convocation समारंभासाठी अध्यक्ष म्हणून मा. श्री. रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य व कुलपती शिवाजी विद्यापीठ तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. पद्मश्री डॉ. संजय पांडे, माजी संचालक, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय. आय. टी.) कानपूर, तर सन्माननीय अतिथी म्हणून मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील, मंत्री उच्च व तंत्र शिक्षण हे उपस्थित राहणार आहेत. 

५९ वा दीक्षांत समारंभ विद्यापीठ स्तरावर केंद्रीय पद्धतीने होणार आहे. दीक्षांत समारंभासाठी विद्यापीठ अनुदान आयोगा(UGC) च्या आवाहनानुसार व विद्यापीठ अधिकार मंडळाने निश्चित केल्याप्रमाणे पांढन्या रंगाचे खादी सलवार कुर्ता, कमीझ किंवा जोधपुरी (पुरुषांसाठी) व पांढन्या / मोती रंगाची खादीची साडी किंवा सलवार कुर्ता (महिलांसाठी) असा पोषाख परिधान करणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना पदवी प्रमाणपत्र पोस्टाने स्वीकारण्याचा पर्याय(Option to accept degree certificate by post) निवडला आहे. त्यांची पदवी प्रमाणपत्रे दीक्षांत समारंभानंतर अर्जावरील पत्त्यावर पोस्टाने पाठवली जाणार आहेत.

सर्व संलग्न तसेच स्वायत्त महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना Through College/In Person हा पर्याय निवडला आहे. अशा पदवीधरांच्या पदवी प्रमाणपत्रांचे विद्यापीठात दीक्षांत समारंभाच्या दिवशी सकाळी 7:30 ते सकाळी 11:00 आणि दीक्षांत समारंभानंतर दुपारी 2:00 ते 5:30 या वेळेत विद्यापीठातील वितरण प्रणालीद्वारे वितरण करण्यात येणार आहे.

Government Identity Card while accepting Degree Certificate: अश्या स्नातकांना पदवी प्रमाणपत्र स्वीकारताना शासकीय ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र इ. यापैकी एक) वितरण अधिकारी यांना दाखवून पदवी प्रमाणपत्रे घेता येणार आहेत.

Degree Certificates of Distance Education Course Students: दूरशिक्षण अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे दीक्षांत समारंभानंतर अर्जावरील पत्त्यावर पोस्टाने पाठवली जातील. 59 व्या दीक्षांत समारंभासाठी व्यासपीठ पुरस्कार प्राप्तकर्त्यांव्यतिरिक्त, पीएच.डी. पदवीधरांची यादी आणि पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या वेबसाइटवर (www.unishivali.ac.in/59convocation) प्रकाशित केली आहे.

For information on Degree Certificate Number: पदवी प्रमाणपत्र क्रमांकाच्या माहितीसाठी कृपया विद्यापीठाच्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकचा वापर करा.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या