सांगली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या माधवनगर या गावांमध्ये शनिवार पेठेत दत्त मंदिर असून हे फडके यांचे दत्त मंदिर आहे. सदर दत्त मंदिरामध्ये दत्तात्रेय यांची मूर्ती पांढऱ्या रंगाच्या संगमरवरी पाषाणाची आहे. ही मूर्ती त्रिमुखी आणि षड्भुज असून ती बाल रूपातील आहे.
मूर्तीच्या पुढे एकूण चार श्वान आहेत तर मूर्तीच्या मागील बाजूस गाय आहे. मूर्तीच्या समोर लगेचच एक लहानसा कट्टा आहे त्यावर काळ्यापाषाणामधील पादुका ठेवण्यात आले आहेत. दक्षिण बाजूला विशाल औदुंबर वृक्ष असून हे मंदिर पूर्व बाजूला तोंड करून आहे.
वासुदेव विष्णू फडके हे या मंदिराचे मालक असून सातारा जिल्ह्यामध्ये रेवेन्यू या खात्यामध्ये ते नोकरी करत असत मात्र त्यांना शारीरिक पीडा झाल्याने श्री शेत्र गाणगापूर आणि औदुंबर येथे श्री सेवेसाठी दोन वर्ष सेवा केली. त्यानंतर पुढे लगेचच त्यांना प्रकृतीच्या कारणांनी सेवानिवृत्त व्हावे लागले.
गाणगापूर येथे असताना त्यांच्या अंगात संचार होऊन श्रींची स्थापना करण्याविषयी त्यांना आदेश देण्यात आला औदुंबर येथे मार्गशीर्ष महिन्यात फडके यांना श्रींनी स्वप्नात येत स्थापनेबद्दल कल्पना दिली.
23 जानेवारी 1942 रोजी त्यांनी शके 1863 माघ शुद्ध सप्तमी या दिवशी माधवनगर येथे शनिवार पेठ मध्ये श्रींची स्थापना केली.
ज्या पद्धतीने औदुंबर नरसिंह वाडी आणि गाणगापूर या ठिकाणी त्रिकाळ पूजा होते त्याच पद्धतीने माधवनगर येथील या श्रींच्या मंदिरात त्रिकाळ पूजा होते. प्रत्येक पौर्णिमेस श्री दत्तप्रभूंची पालखी काढण्यात येत असून ही पालखी काढण्याची सोहळा आहे तो खूप प्रेक्षणीय आहे. चतुर्मास मध्ये पालखी काढली जात नाही.
या मंदिरात रामनवमी, हनुमानजयंती, गुरुपौर्णिमा, श्रीपादवल्लभजयंती (गणेशचतुर्थी), गुरुद्वादशी, श्रीनृसिंहसरस्वतीजयंती (पौष शु. २) माघ वद्य ५ औदुंबर पंचमी असे उत्सव, समारंभ साजरे केले जातात. प्रभुस्थापनेचा वाढदिवस हा सर्वात मोठा उत्सव माघ शु. सप्तमी ते नवमी असा तीन दिवसांचा असतो.
Dutt Utsav:
शनिवार पेठ, माधवनगर येथील मंदिरात रामनवमी, हनुमान जयंती, गुरुपौर्णिमा, श्रीपाद वल्लभ जयंती (गणेश चतुर्थी), गुरुद्वादशी, श्री नृसिंह सरस्वती जयंती (पौष शु. २) माघ वद्य ५ औदुंबर पंचमी असे समारंभ उत्सव या मंदिरात साजरे केले जातात. श्रींच्या स्थापनेचा वाढदिवस म्हणून सर्वात मोठा उत्सव जानेवारी/ फेब्रुवारी महिन्यातील माघ शुक्ल सप्तमी ते नवमी असं तीन दिवस येथे उत्सव असतो.
यावर्षी म्हणजेच सन 2023 मध्ये माघ शुक्ल सप्तमी 28 जानेवारीला असून तेथून 30 जानेवारीपर्यंत हा उत्सव चालणार आहे. ह्या उत्सवाला श्रींचे भक्त जमतात. पूजाअर्चा केली जाते.
संदर्भ:- dattamaharaj . com


