मालिकेतील विलास पाटील हे भूमिका साकारणारे किरण माने यांच्या शानदार आणि तगड्या स्वभावाच्या पात्राने प्रेक्षक वर्गाला भुलवून टाकले आहे.
परंतु सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातमी प्रमाणे स्टार प्रवाहाने किरण माने यांना मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
किरण माने यांच्या महिला कलाकारांसोबत आढळलेल्या गैर वागणुकीमुळे त्यांना मालिका सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. असे स्टार प्रवाहच्या सदस्यांचे मत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार किरण माने यांनी काही दिवसांपूर्वी राजकीय माहितीमध्ये हस्तक्षेप करून त्याबाबतीत काही पोस्ट शेअर केले होते.
मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील च्या भूमिकेत नवीन कोणता अभिनेता दिसेल याची उत्सुकता तुम्हाला असेलच ना.
किरण माने यांची जागा आता अभिनेते आनंद अलकुंटे यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती जरी समोर आली असली ,तरी प्रोडक्शन हाऊस कडून याबाबत खुलासा करण्यात आले नाही.


