CTET Notification 2023: केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET) च्या 17 व्या आवृत्तीसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना सूचित केले जाते की CTET परीक्षा आता ऑफलाइन मोडमध्ये म्हणजेच पेन-पेपर (OMR) 20.08.2023 (रविवार) रोजी घेतली जाईल असे CBSE ने जारी केलेल्या नोटीसमध्ये असे म्हटले आहे. ही परीक्षा देशभरात आयोजित करण्यात येणार आहे. CBSE CTET exam 20 ऑगस्ट 2023 रोजी दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली शिफ्ट सकाळी 9.30 ते दुपारी 12.00 पर्यंत आणि दुसरी शिफ्ट दुपारी 2.30 ते 5.00 पर्यंत चालेल.
यापूर्वी, परीक्षेची प्रवेशपत्रे (CTET Admit Card 2023) योग्य वेळेत दिली जातील. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना आवश्यक माहिती प्रविष्ट करावी लागतील. सीबीएसईने CTET च्या अधिकृत वेबसाइटवर परीक्षा, अभ्यासक्रम, पात्रता आणि इतर भाषांबाबत तपशीलवार अधिसूचना जारी केली होती. प्रवेशपत्रावर परीक्षेचे शहर, परीक्षा केंद्र, अहवाल देण्याची वेळ, शिफ्ट, मार्गदर्शक तत्त्वे आदींची माहिती दिली जाईल.
एक्साम पॅटर्न कसा असतो?
CTET Exam मध्ये 2 पेपर असतात. इयत्ता 1 ते 5 साठी शिक्षक बनायचे आहे अश्यासाठी पेपर I आहे. तर, ज्या उमेदवारांना इयत्ता 6 वी ते 8 वीसाठी शिक्षक व्हायचे आहे त्यांच्यासाठी पेपर II देण्याचे प्रयोजन करण्यात येते. या परीक्षेतील सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील, प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिले जातील. CTET परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, उमेदवार शिक्षक पदावर भरती होण्यास पात्र होऊ शकतात. CTET 2023 अर्ज प्रक्रिया 27 एप्रिल रोजी सुरू झाली. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 मे 2023 ही निश्चित करण्यात आली होती.
मराठी मध्ये - कंटेंट एक्साम दाते २०२३


