Amazon

Ads Area

header ads
header ads

आश्रमशाळेतील रिक्त पदे भरणार

राज्यातील सर्व शासकीय आश्रमशाळांमधील रिक्त पदे भरून शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी केले.
State Tribal Development Minister and District Guardian Minister Vijaykumar Gavit asserted that students will be given priority while filling vacancies in all government ashram schools in the state along with giving priority to educational quality.


तळोदा तालुक्यातील लोवणी येथील शासकीय आश्रम शाळेच्या प्रांगणात शासकीय सेवेत नियमित झालेल्या कर्मचाऱ्यांचा नियुक्ती आदेश वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ.हिना गावित, विधानपरिषदेच्या आमदार आमश्या पाडवी, आदिवासी विकास आयुक्त श्रीमती. नयना गुंडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, आदिवासी विकास नाशिकचे अतिरिक्त आयुक्त संदीप गोलाईत आदी या कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी डॉ.गावित म्हणाले की, 6 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये 10 वर्षांहून अधिक सेवा केलेल्या वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांवर आदिवासी विकास विभागाने कारवाई केली असून 645 राज्यातील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत नियमित करण्यात आले आहे. तळोदा प्रकल्पातील 244 वर्ग 4 कर्मचाऱ्यांना आज पालकमंत्री डॉ.गावित यांच्या हस्ते कायमस्वरूपी नियुक्ती आदेशाचे वाटप करण्यात आले. या सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन स्तरावर वेतन निश्चित करून लाभ मिळणार असून, नियमितीकरणाच्या तारखेपासून कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता लागू केली जाईल, असे ते म्हणाले.

यावेळी खासदार डॉ.हिना गावित, आमदार आमश्या पाडवी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांचे आदिवासी पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा अंतर्गत आश्रमशाळांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या वर्ग चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नियुक्ती आदेशांचे वाटप करण्यात आले.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या