Amazon

Ads Area

header ads
header ads

इयता 1 ली ते 5 वी या वर्गांस शिकवण्यासाठी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता काय हवी; घ्या जाणून एका क्लिकवर

शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा म्हणजेच टी ए आय टी परीक्षा 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 या काळामध्ये घेण्यात आली त्यानंतर याचा निकाल 24 मार्च 2023 ला लावण्यात आला होता त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी पीडीएफ स्वरूपामध्ये वैयक्तिक गुणपत्रक डाऊनलोड करण्याची वेबलिंकसुद्धा देण्यात आली होती. 
What are the educational and professional qualifications of teachers to teach classes 1st to 5th.

या सर्व घडामोडीनंतर आता शिक्षक होऊ इच्छित असणाऱ्या उमेदवारांना पवित्र पोर्टल कधी चालू होईल याची उत्सुकता लागून आहे  मात्र आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपलं शैक्षणिक अहर्ता काय आहे. अन त्यानुसार आपल्याला कितव्या इयत्तेला शिकवायला मिळेल याबाबत संभ्रमता पाहायला मिळते आणि यासाठीच आम्ही तुमच्यासाठी आपण कितवी ते कितवी इयत्तेसाठी आपल्याकडे शैक्षणिक आणि व्यावसायिक कोणकोणत्या अहर्ता असायला हव्यात याबद्दलची माहिती देणार आहोत. या पोस्टमध्ये आपण 1ली ते 5वी या वर्गासाठी आपल्याकडे काय शैक्षणिक अहर्ता पाहिजेत हे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत.

ही माहिती आपल्याला उपयोगी पडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ही माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. जेणेकरून ते देखील शिक्षक होऊ इच्छित असतील तर त्यांना देखील या माहितीचा उपयोग होऊ शकेल.

ही माहिती आम्ही शासन शुध्दिपत्रक शा.शि. व क्री. वि. क्र. संकिर्ण-२०१८/प्र.क्र.३९७/ टीएनटी-१ दि. २५ फेब्रुवारी, २०१९ यामधून घेत आहोत. 

इयत्ता 1 ली ते 5 वी साठी शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता: 


इयत्ता 1 ली ते 5 वी साठी सर्व विषय शिकवण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समतुल्य) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि मान्यताप्राप्त संस्थेतून प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण (कोणत्याही नावाने) असावा.

अथवा

उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान ५०% गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समतुल्य) परीक्षा उत्तीर्ण आणि प्राथमिक शिक्षण (B.B.Ed.) ४ वर्षेची परीक्षा उत्तीर्ण असावा

अथवा

उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान ५०% गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समतुल्य) परीक्षा उत्तीर्ण आणि दोन वर्षांची प्राथमिक शिक्षणशास्त्र डिप्लोमा(पदविका) परीक्षा (विशेष शिक्षण) राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण केलेला असावा.

अथवा

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद 2002 च्या तरतुदींनुसार मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 45% गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समतुल्य) परीक्षा आणि मान्यताप्राप्त संस्थेतून (कोणत्याही नावाने) प्राथमिक शिक्षणातील दोन वर्षांची डिप्लोमा(पदविका) परीक्षा (DT.Ed.) उत्तीर्ण

अथवा

मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या संस्थेतून बी. एडची परीक्षा उत्तीर्ण झाली

अथवा

TCH (महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील ८६५ गावांतील उमेदवार कर्नाटक राज्य TCH परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत) 

(टिप: बी.एडची पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांचा इयत्ता 1 ली ते 5 वी शिकवण्यासाठी शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी विचार केला जाईल. मात्र, त्यांना सहा महिन्यांचा राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचा प्राथमिक शिक्षणाचा ब्रिज कोर्स पूर्ण करणे बंधनकारक आहे).

यासोबत उमेदवाराने शिक्षक पात्रता परीक्षा (TET) चा पेपर एक सुद्धा 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) चांगल्या गुणासह उत्तीर्ण झाल्यास निघालेल्या जागानुसार मेरिट लिस्ट लावून विना मुलाखत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत नेमणूक दिली जाते.

असे सर्व निकष शिक्षक होऊ इच्छित असलेल्या इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गांना अध्यापन करू इच्छित असलेल्या उमेदवारांना पूर्ण करावं लागणार आहे. 

ही माहिती आपल्याला उपयोगी असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या भावी शिक्षकांना ज्यांना पहिली ते पाचवी या वर्गासाठी शिकवायची इच्छा आहे, अशा उमेदवारांना नक्की पाठवा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या