Amazon

Ads Area

header ads
header ads

TAIT परीक्षा पास झालात - पवित्र पोर्टलवर नाव देण्यासाठी ही कागदपत्रे तयार ठेवा

शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2023 ही परीक्षा 22 फेब्रुवारी ते 3 मार्च या दरम्यान घेण्यात आली होती आणि त्याचा निकाल काल 24 मार्च 2023 रोजी लागलेला आहे. आता निकाल तर लागला आता पुढील प्रक्रिया काय असेल याबद्दल अनेकांना प्रश्न पडत आहेत. 
Pavitra Portal Sathi Lagnare Kagadpatre

आता निकाल लागलेला असून पवित्र पोर्टल प्रणाली लवकरच सुरू होणार आहे. आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रे आजपासूनच जमवून ठेवा. म्हणजे ऐनवेळी होणारी धावपळ करावी लागणार नाही.



पवित्र पोर्टलसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी:

List of Documents Required for Pavitra Portal
 
पवित्र पोर्टल शिक्षण सेवक प्राप्त यादीनुसार कागदपत्र 
अ.क्रकागदपत्राची यादी
1(10th) एस. एस. सी गुणपत्रक व प्रमाणपत्र
2एच.एस. सी. गुणपत्रक व प्रमाणपत्र
3पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र
4पदव्युत्तर गुणपत्रक व प्रमाणपत्र
6डी. एड गुणपत्रक व प्रमाणपत्र क्र व दिनांक
7बी.एड गुणपत्रक व प्रमाणपत्र क्र व दिनांक
8रहिवास प्रमाणपत्र क्रय दिनांक
9एम.एस.सी.आय.टी. क्र व दिनांक
10टी.ई.टी प्रमाणपत्र क्र व दिनांक व गुण
11जातीचे प्रमाणपत्र
12नॉन क्रिमिलेअर लागु असल्यास क्र.
13नियुक्तीचा प्रवर्ग ( Cast Category )
14नियुक्तीचा प्रकार / समांतर आरक्षण प्रवर्ग
15जात वैधता प्रमाणपत्र क्र व दिनांक
16दिव्यांग असल्यास ऑनलाईन प्रमाणपत्र क्र. व दि. दिव्यांगाचा प्रकार
17अभियोग्यता चाचणी निकालाची प्रत (TAIT)
18महिला आरक्षणा बाबत प्रमाणपत्र
19माजी सैनिक / आजी सैनिक सवलत प्रमाणपत्र
20शासन अधिसुचनेनुसार दि.२८ मार्च २००५ अन्वये तिसरे अपत्य नसले बाबतचा दाखला
21आधार कार्ड / मतदान कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स/ पॅन कार्ड (पैकी एक)

वर दिलेल्या टेबल मधील सर्व कागदपत्र आपण नक्की तयार ठेवा जेणेकरून आपल्याला ज्यावेळी कागदपत्र मागतील त्यावेळी धावपळ करावी लागणार नाही.

ही कागदपत्रांची यादी 2017 वर्षी झालेल्या शिक्षक भरती वेळी मागवण्यात आली होती. (Pavitra Portal Information in Marathi)
यावर्षी आणखी काही कागदपत्र मागवली असतील तर ती वेळोवेळी येथे अपडेट करण्यात येईल त्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेट देत चला.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या