Amazon

Ads Area

header ads
header ads

Maharashtra TAIT Result ची उमेदवारांमध्ये उत्सुकता

MahaTAIT 2023 / 2022 Result Date: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल २४ मार्च रोजी जाहीर होणार असून, निकालाबाबत उमेदवारांमध्ये उत्सुकता आहे.
Maharashtra TAIT Result Date

राज्यातील स्थानिक सरकारी संस्था आणि खाजगी शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया आता केवळ ऑनलाइन पोर्टलद्वारे आयोजित केली जाते. शिक्षक पात्रता परीक्षा (TET) आणि अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी(TAIT) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अध्यापन पदांसाठी अर्ज करण्याची संधी दिली जाईल. ही परीक्षा 2017 पासून दुसऱ्यांदा नुकतीच आयोजित करण्यात आली आणि ती 22 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत झाली.

महाराष्ट्र TAIT परीक्षेसाठी 2 लाख 39,726 उमेदवारांनी नोंदणी केली होती. यात दुहेरी अर्ज नोंदणी होती ती वगळून 2 लाख 28,084 उमेदवारांना प्रवेशपत्र देण्यात आले. यांपैकी 2 लाख 16,444 उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. Maha TAIT परीक्षा ऑनलाइन असल्याने निकालही तातडीने लागणे अपेक्षित आहे. मात्र त्यास विलंब होत आहे. महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या निकालाच्या तारखेबाबत उमेदवारांकडून सातत्याने होत असलेल्या चौकशीमुळे अखेर परिषदेने वेबसाइटवर नोटीसद्वारे तारीख प्रसिद्ध केली आहे.

पडताळणीनंतरच निकाल

निकाल बॅचनिहाय तयार केला जात आहे. सामान्यीकरण देखील केले जाईल. प्रत्येक प्रश्नासाठी तज्ज्ञांचा अभिप्रायही मागवला जात आहे. निकाल तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची पडताळणी केल्यानंतरच तो जाहीर केला जाईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या