प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे लग्न असते. पूर्वी वडीलधारी मंडळी जमून लग्नाबाबतचे निर्णय घेत. हळूहळू काळ बदलत गेला त्यानंतर ओळखीच्या पाहुण्यांमध्ये अति मावशी यांच्याकडून लग्न जुळवण्याची प्रथा उदयास आली.
इंटरनेटचे युग आल्यानंतर 2000 पासून मॅट्रिमोनियल साईट्स आपल्याला रोजचे झाल्यासारखे पाहायला मिळत आहेत. आणि अशा मॅट्रिमोनियल साईट्समुळे मुलाला, मुलीला आपल्याला आवडत्या मनपसंत अशा वधूवरांसोबत लग्न करायची मुभा मिळाल्याची आपल्याला नक्कीच माहिती असेल. अलीकडच्या काळामध्ये तर बहुसंख्य लग्न ही ऑनलाईन मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातूनच होतात.
| नक्की वाचा
मॅट्रिमोनियल वेबसाईटचे मुख्य ध्येय लग्न जमवणे हे असते. मात्र काही दिवसांपूर्वी मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेने मॅट्रिमोनियल साईटच्या माध्यमातून नोकरी नोकरी मिळवल्याची माहिती समोर येत आहे. लिंकडीन या नोकरी आणि करिअर संबंधित वेबसाईट पोर्टल वर एक पोस्ट सध्या व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. पोस्ट करती व्यक्ती ही गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर या पदावर काम करतात. त्यांचं नाव अश्विन बंसल असून त्यांनी लिंकडीनवर ही पोस्ट केली आहे.
सध्या या पोस्टला 30000 पेक्षा जास्त लाईक आलेले पाहायला मिळतात, बऱ्याच जणांनी पोस्ट खाली कमेंट देखील करत प्रतिक्रिया दिले आहेत वायरल पोस्टमध्ये अनेक युजरने कमेंट करत शेअर देखील केले आहेत तर बरेच जण याला जुगाड म्हणत आहेत.
| नक्की वाचा
वायरल पोस्टमध्ये आश्विन बन्सल म्हणतात, माझ्या एका मैत्रिणीने जीवनसाथी डॉट कॉम वर प्रोफाईल तयार केले असून या वेबसाईटवर ती वेगवेगळ्या लोकांचे प्रोफाइल पहात असते आणि यामधून तिला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या पगाराची आणि सुविधांची माहिती मिळते. यामध्ये सगळ्यात उत्तम पर्याय असणाऱ्या कंपनीमध्ये ती मैत्रीण नोकरीसाठी अर्ज करते. अशा आशियाची पोस्ट त्यांनी काही दिवसांपूर्वी शेअर केली होती. एकूणच या पोस्टवरून आपल्याला कळते की भारतीय कोणत्याही गोष्टीचा वापर योग्य वेळ आणि सोयी पाहून नक्कीच करून घेतात याला जुगाड म्हणणे देखील योग्यच आहे.
The main goal of matrimonial websites is to arrange marriages. But according to the information received a few days ago, information is coming out that a woman got a job through a matrimonial site. A post on LinkedIn, a job and career related website portal, seems to be going viral right now. The person posting is working as a Software Engineer in Google. His name is Ashwin Bansal and he posted this on LinkedIn.


