Amazon

Ads Area

header ads
header ads

आधार प्रमाणीकरणादरम्यान बोटांचे ठसे अस्पष्ट झाल्यास लाभार्थ्यांना कार्ड नॉमिनी सुविधा – मंत्री रवींद्र चव्हाण | Card nominee facility

अनेक वयोवृद्ध लोकांच्या बोटांचे ठसे अस्पष्ट झाले असल्याने आधार प्रमाणीकरण करताना समस्या येत आहेत. आता अशा लाभार्थ्यांसाठी 29 डिसेंबर 2020 पासून 'कार्ड नॉमिनी' सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
Card nominee facility to beneficiaries in case of unclear fingerprints during Aadhaar authentication – Minister Ravindra Chavan

विधानसभा सदस्य कॅप्टन आर. तमील सेल्वन यांनी रेशन वाटपाबाबतच्या धेारणामध्ये बदल करण्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, आतापर्यंत 14 हजार 282 जणांनी कार्ड नॉमिनी सुविधेचा लाभ घेतला आहे. भविष्यात बोटांचे ठसे उपलब्ध न झाल्यास नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून लाभार्थींचे ‘डोळ्याचे ठसे’ (Eye impression) बनवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ कसा मिळेल, याचा अभ्यास केला जात आहे.


सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत रास्त भाव दुकानांमध्ये शिधावाटप करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून रेशनचे वितरण केले जाते. जानेवारी 2023 चे धान्य वाटप करण्यात आले असून फेब्रुवारी 2023 चे धान्य वितरण सुरु आहे. काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे लाभार्थ्यांना धान्य न मिळाल्यास त्या महिन्याचे धान्य ई-पॉस मशिनमध्ये पुढे नेले जाते व पुढील महिन्यात ते लाभार्थ्यांना मिळते, असे मंत्री श्री. चव्हाण म्हणाले.

सलग 3 महिने शिधापत्रिकेवर अन्नधान्य न घेतल्यास लाभार्थींचे अन्नधान्य बंद करण्यात येत नसल्याचे यावेळी मंत्री श्री. रविंद्र चव्हाण म्हणाले.

Many elderly people are facing problems in Aadhaar authentication as their fingerprints have become blurred. Now for such beneficiaries 'Card Nominee' facility has been made available from 29th December 2020, said Minister for Food and Civil Supplies and Consumer Protection Ravindra Chavan.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या