आत्मनिरीक्षण पद्धती व्याख्या: अंतर्मुख होऊन स्वतः केलेल्या अनुभवाचे निरीक्षण म्हणजे आत्मनिरीक्षण पद्धती होय.
आत्मनिरीक्षण पद्धतीचे गुण:
👆आत्मनिरक्षणामुळे स्वतःचे दोष कळतात व कमी करता येतात.
👆 प्रयोजक आणि प्रयोजन हे दोन्ही एकच व्यक्ती करत असते.
👆 आत्मह्यरक्षण पद्धत ही बिन खर्चिक पद्धत आहे.
👆 या पद्धतीचा वापर करण्यासाठी आपल्याला कोणत्याही काळाचा वेळेचे बंधन नाही.
👆 आत्म निरीक्षण पद्धत केव्हाही कोठेही वापरता येते.
👆 आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये आपल्या मनामधील भावना आपण स्पष्टपणे सांगू शकतो.
आत्मनिरीक्षण पद्धतीमधील दोष:
👎 आत्मनिरीक्षण पद्धती लहान मुलांवर करणे शक्य नाही.
👎 आत्मनिरीक्षण पद्धतीमधील काढलेले निष्कर्ष हे विश्वासार्ह असतील असे नाही.
👎 मनोरुग्ण व्यक्तींसाठी आत्मनिरीक्षण पद्धत कुचकामी ठरते.
👎 एखादी व्यक्ती अप्रमाणिक किंवा खोटी असेल तर त्याने काढलेले निष्कर्ष चुकीचे असू शकतात.
👎 आत्मनिरीक्षण पद्धतीने मनामध्ये लपलेल्या भावनांचा अभ्यास करता येत नाही.
👎 आत्म निरीक्षण पद्धत ही व्यक्ती सापेक्ष आहे.
👎 एकदा घेतलेल्या अनुभवाचा पडताळा आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये पुन्हा घेता येत नाही.
👎 आत्म निरीक्षण करताना एखादी व्यक्ती तिला काय वाटलं यापेक्षा काय वाटायला हवे होते हे सांगण्याची शक्यता असते.
👎 एखाद्या प्रसंगाचे निरीक्षण न करणे म्हणजे अनिरिक्षण होय.
👎 आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये एकाच वेळी प्रयोज्य आणि प्रयोग अशी भूमिका निभवणे कठीण असते.
👎 एखाद्या प्रसंगाचे चुकीचे निरीक्षण करणे म्हणजेच अपनिरीक्षण म्हणतात.
आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये आपण या पद्धतीचे गुण आणि दोष पाहिले आहेत. मानसशास्त्रीय दृष्टीने आत्मनिरीक्षण पद्धती महत्त्वाचे आहे. आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये अंतर्मुख होऊन स्वतः अनुभवाचे निरीक्षण करावे लागते. या पद्धतीमध्ये प्रयोजक आणि प्रयोजन हे दोघेही एकच व्यक्ती असतात त्यामुळे अशी भूमिका निभावना कठीण असते. आत्म निरीक्षण पद्धती यामध्ये हे जर निरीक्षण केले ही पद्धत जर अवलंबली तर स्वतःचे दोष कमी करता येतात.


