Amazon

Ads Area

header ads
header ads

बाह्य निरीक्षण पद्धती | मानसशास्त्र Notes फोर TAIT

बाह्य निरीक्षण करताना हे निरीक्षण वस्तुनिष्ठ असणे गरजेचे असते. बाह्य निरीक्षण करताना निरीक्षण करणारे व्यक्ती तटस्थ भूमिका घेणारे असावी. निरीक्षण करत असताना अवॉर्ड निवड आणि पूर्वग्रह यांचा परिणाम निरीक्षणावर होऊ देता कामा नये. निरीक्षण करत असताना तात्काळ त्या निरीक्षणाच्या नोंदी करणे खूप गरजेचे असते.

बाह्य निरीक्षण पद्धतीचे गुण:

👍 बाह्य निरीक्षण पद्धतीमुळे आपल्याला वस्तुनिष्ठ अभ्यास करता येते.
👍 बाह्य निरीक्षण पद्धतीमुळे कमी वेळामध्ये आपल्याला जास्त माहिती मिळवता येते
👍 मतिमंद व्यक्ती आणि मनोविकृत माणसे यांच्यासाठी बाह्य निरीक्षण पद्धती उपयुक्त आहे.
👍 लहान मुलांचा अभ्यास करण्यासाठी बाह्य निरीक्षण पद्धती योग्य आहे.
👍 आधुनिक साधनांचा वापर करून बाह्य निरीक्षण पद्धतीमध्ये आपल्याला अचूकता आणता येते
👍 मानव आणि मानवी तर प्राणी यांचा सामाजिक अभ्यास बाह्य निरीक्षण पद्धतीद्वारा करता येते.

बाह्य निरीक्षण पद्धतीचे दोष:

👎 बाह्य वर्तनाचा अभ्यास भायनरीक्षण पद्धतीमध्ये केला जातो त्यामुळे अंतर्मुख वर्तनाचा अभ्यास करता येत नाही.
👎 व्यक्तीला आपले निरीक्षण होत आहे असे जर समजले तर त्याच्या वर्तनामध्ये कृत्रिमता येण्याची शक्यता आहे. 
👎 ज्या व्यक्तीचे, प्राण्याचे निरीक्षण करायचे आहे त्याच्यावर ताबा मिळवता येत नाही.
👎 पूर्वग्रहाचा निरीक्षणावर परिणाम होण्याची शक्यता असते.
👎 सतत निरीक्षण केले तर निरीक्षक थकतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम निरीक्षणावर दिसून येतो.
👎 बाह्य निरीक्षण पद्धतीमध्ये निरीक्षणाच्या नोंदी तात्काळ केल्या नाहीत तर निरीक्षण योग्य होणार नाही.
👎 प्रयोजकाच्या अंतरिक घटकावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही.

बाह्य निरीक्षण पद्धती हे कमी वेळामध्ये जास्त माहिती मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. या बाह्य निरीक्षण पद्धतीमुळे आपल्याला व्यक्तीचा प्राण्याचा वस्तुनिष्ठ अभ्यास करता येतो. त्याच पद्धतीने जी व्यक्ती निरीक्षण करणार आहे त्या व्यक्तीने तटस्थ भूमिका घेतलेली असायची गरज आहे. बाह्य निरीक्षण करत असताना आधुनिक साधनांचा उपयोग करून आपल्याला निरीक्षणामध्ये अचूकता आणता येते. बाह्य निरीक्षण पद्धतीचे आपण गुण आणि दोष वर पहिल्या प्रमाणे आहेत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देत असताना आपल्याला मानसशास्त्र विषयावर बाह्य निरीक्षण पद्धतीवर प्रश्न येऊ शकतात.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या