Amazon

Ads Area

header ads
header ads

शैक्षणिक मानसशास्त्र | Educational Psychology PDF Notes for TAIT

मन आणि वर्तणूक यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय. शास्त्र म्हणजे विज्ञान. आणि मन आणि वर्तणूक या दोघांचा अभ्यास करणारे विज्ञान हे मानसशास्त्र आहे. मानसशास्त्र याला इंग्लिश मध्ये psychology असा शब्द आहे यामधील Psyche म्हणजे आत्मा आणि Logus म्हणजे शास्त्र होय. हे दोन्ही ग्रीक शब्द असून यापासून सायकॉलॉजी म्हणजे मानसशास्त्र हा शब्द तयार झाला आहे आणि या शब्दाचा अर्थ आत्म्याचे शास्त्र असा होतो. मात्र या संकल्पनेला काही तत्त्वज्ञानी विरोध करतात कारण आत्मा ही गोष्ट आपण पाहू शकत नाही आत्मा एक धूर अमूर्त आणि सिद्ध न करता येण्याजोगी संकल्पना आहे. त्यामुळे याचा शास्त्रशुद्ध असा अभ्यास करता येत नाही. म्हणून मानसशास्त्र म्हणजे मनाचे शास्त्र किंवा मानसिक जीवनाचे शास्त्र अशी व्याख्या करण्यात आली. पण मन आणि आत्मा या दोन्हींची ही निरीक्षण प्रयोग चिकित्सा करता येत नाही तसेच मन आपण इतर अवयवांप्रमाणे डोळ्याने पाहू शकत नाही किंवा त्याचे अस्तित्व आपल्याला दाखवता येत नाही हे अभ्यास करणाऱ्या लोकांच्या लक्षात येऊ लागले. 

मानसशास्त्राचा अभ्यास करणारे मानसशास्त्रास शास्त्रीय आधार प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न चालू केले आणि यामधूनच जर्मनी, ऑस्ट्रिया येथील शास्त्रज्ञांनी मानसशास्त्रावर आधारित असलेले वेगवेगळे प्रयोग करायला चालू केले. विल्यम वून्ट या शास्त्रज्ञाने 1862 मध्ये मानसशास्त्राच्या अभ्यासास चालना दिली. विल्यम उंट यांनी 1779 वर्षी जर्मनीमधील लाईपझिंग या ठिकाणी मानसशास्त्राची प्रथम प्रयोगशाळा स्थापन केली. या प्रयोग शाळेमध्ये त्यांनी मानसशास्त्रावर आधारित असलेले प्रयोग करण्यास सुरुवात केली. मानसशास्त्राला शास्त्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी विल्यम वूंट यांनी प्रयत्न केले.

त्यामुळे विल्यम वूंट यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनक असे म्हटले जाते. 

सिग्मंड फ्राईड यांनी देखील विल्यम वुंट यांच्यासारखे वेगवेगळे संशोधन करत आपले मत मांडले आहे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनेक चांगले वाईट अनुभव येतात आणि हे अनुभव आपल्या जाणिवेच्या पलीकडे असतात सामाजिक नैतिक आर्थिक इत्यादी कारणांमुळे हे अनुभव दडपले जाण्याची शक्यता असते बऱ्याच वेळा याचे अस्तित्व आपल्याला जाणवत नाही याला आपण अबोधावस्था असे म्हणतो. 

सिग्मंड फ्राईड यांनी मानसशास्त्र हे अबोधावस्थेचे शास्त्र असल्याचं म्हणलं आहे.

वर्तनाचा आणि त्याच्यासोबत निगडित प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या स्मित आणि वॉटसन यांनी केली आहे. 

मानसशास्त्राची व्याख्या:

मॅकड्युगल : मानसशास्त्र म्हणजे मनाचे अभ्यास करणारे शास्त्र होय.
मानवी मनाचे अनुभव निश्चित वर्णनात्मक शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.

जे बी वॉटसन
मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र.

मॉर्गन किंग आणि रोबीन्स:
मानव आणि मानवी तर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र.

ऍरिस्टॉटल यांनी डी एनिमा हा ग्रंथ लिहिला आहे आणि या ग्रंथांमध्ये आत्म्याविषयी माहिती दिली आहे.

प्लूटो यांनी रिपब्लिक हा ग्रंथ लिहिला आहे या ग्रंथामध्ये व्यक्ती भिन्नते विषयीचे विचार त्यांनी मांडले आहेत.

मानसशास्त्राचे प्रकार

मानसशास्त्राचे विविध प्रकार असून ते आपण खालील प्रमाणे अभ्यासूया:

शैक्षणिक मानसशास्त्र:
शैक्षणिक मानसशास्त्र उपयोजित शास्त्र असून त्यामध्ये अध्ययन अध्यापनाशी निगडित असलेल्या गोष्टींचा अभ्यास केला जातो.

बाल मानसशास्त्र: 
बालमानसशास्त्र या मानसशास्त्राच्या शाखेमध्ये बालकांच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा अभ्यास केला जातो. बालकांमध्ये बौद्धिक, भावनिक आणि क्रियात्मक विकास कशा पद्धतीने आणि कोणत्या पद्धतीने घडून येतो याविषयीचा सखोल अभ्यास या मानसशास्त्राच्या शाखेत केला जातो.

औद्योगिक मानसशास्त्र: 
औद्योगिक मानसशास्त्र या मानसशास्त्राच्या शाखेमध्ये व्यापाराच्या आणि उद्योगाच्या निमित्ताने घडून येणाऱ्या क्रिया प्रतिक्रिया आणि त्यामुळे घडणारा परिणाम या सगळ्याचा अभ्यास मानसशास्त्राच्या या शाखेत केला जातो.

प्राणी मानसशास्त्र: 
प्राणी आणि प्राण्यांचे वर्तन यांचा अभ्यास प्राणी मानसशास्त्र या शाखेत केला जातो. 

गुन्हेगारीची मानसशास्त्र: 
समाजात वावरताना बऱ्याच प्रकारचे गुन्हे घडून येत असतात हे गुन्हे कसे घडतात का करतात? गुन्हेगार कसे तयार होतात? त्यांना गुन्हेगारीपासून कशाने कोणत्या पद्धतीने परावृत्त करता येईल? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास मानसशास्त्राच्या गुन्हेगारीचे मानसशास्त्र या शाखेमध्ये केला जातो.

सामाजिक मानसशास्त्र:
मानवाचा विकास हा समाजात घडत असतो. व्यक्तीच्या वर्तनात समाजात असणाऱ्या श्रद्धा आचार विचार यांचा पगडा दिसून येतो. मानसशास्त्राच्या या शाखेमध्ये व्यक्तीच्या शरीरामध्ये होणारे बदल त्याचा समाजात होणारा परिणाम या सगळ्या बदलांचा अभ्यास मानसशास्त्राच्या या शाखेत केला जातो.

व्यक्ती भेदाचे मानसशास्त्र:
व्यक्ती व्यक्तींमध्ये भेद निर्माण करणारे अनुवंश आणि सभोवतीचा परिसर या सगळ्या घटकांचा अभ्यास मानसशास्त्राच्या व्यक्ती भेदाचे मानसशास्त्र या शाखेत केला जातो. 

शैक्षणिक मानसशास्त्र:

मानसशास्त्राचे उपयोजनात्मक शास्त्र म्हणून शैक्षणिक मानसशास्त्राला ओळखले जाते. शैक्षणिक मानसशास्त्र वास्तववादी शास्त्र असून या शास्त्रात वापरल्या जाणाऱ्या अभ्यास पद्धती या शास्त्रीय आहेत. मानसशास्त्रात असणारे प्रस्थापित सिद्धांत, वेळ, सूत्र इत्यादींचा वापर करत शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी शैक्षणिक मानसशास्त्र प्रयत्नशील आहे. 
शैक्षणिक मानसशास्त्रात अध्ययनकर्त्याच्या वर्तनाचा आणि त्याच्या वर्तनावर परिणाम करणाऱ्या इतर घटकांचा अभ्यास केला जातो. शैक्षणिक मानसशास्त्रात अध्ययन अध्यापन प्रक्रिया ज्या ठिकाणी घडते म्हणजेच शाळा शाळेमधील वर्ग शाळेभोवतीचा परिसर अनेक शैक्षणिक वातावरण या आणि अशा गोष्टी महत्त्वाच्या असतात. 

शैक्षणिक मानसशास्त्राचा प्रमुख विषय अध्ययन हा आहे तसेच शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये व्यक्तिमत्व अभ्यास प्रमुख दिसून येतो. 

शिक्षण कसे द्यावे? शिक्षण का द्यावे? शिक्षण केव्हा द्यावे? शिक्षण कोठे द्यावे? या सर्व प्रश्नांचा अभ्यास शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये केला जातो.

शैक्षणिक मानसशास्त्राच्या मर्यादा:
स्वतः अंतर्मुख होऊन एखाद्या अनुभवाची निरीक्षण शैक्षणिक मानसशास्त्रात करावे लागते. अध्यापन हे केवळ शास्त्र नाही तर कला देखील आहे. एखाद्या बाबतीमधील वर्तन असे का घडले यामागील कारण मानसशास्त्र देऊ शकत नाही. मानसशास्त्राची मांडणी इतर शास्त्राप्रमाणे व्यवस्थित नाही. मानसशास्त्रामध्ये काही गुंते अजून आहेत.

मानवी वर्तन हे विविध प्रकारचे असते त्यामुळे अनेक प्रकारचे प्रयोग करून निष्कर्ष चे सामान्यीकरण करता येत नाही.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या