Amazon

Ads Area

header ads
header ads

श्री मामामहाराज केळकर माहिती (Shri Mamamaharaj information)

श्रीमामामहाराज माहिती (Shri Mamamaharaj information): श्री मामा महाराज केळकर म्हणजेच श्री गोविंद अनंत यांचा जन्म केळकर कुटुंबामध्ये शहापूर या गावांमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री अनंतराव होते तर त्यांच्या आईचे नाव सौ राधा होते. ते जन्मापासूनच विरक्त हरी भक्त म्हणून ओळखले जात असत. नेहमी देवाचे नामस्मरण करणे भजन करत राहणे हे त्यांचे लहानपणी छंद होते.
बुधगाव येथील रेल्वे स्टेशनवर श्री मामा महाराज हे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या दर्शनास गेले असता बालवयांमधील मामा महाराजांना भेटून गोंदवलेकर महाराज यांना पाहून प्रत्यक्षात आई भेटल्याचा आनंद त्यांना झाला. गोंदवलेकर महाराज यांनी यावेळी मामा महाराजांना लहान असताना सांगितले आई-वडिलांचे ऐकावे, रामाचे तीर्थ घ्यावे असे म्हटले. गोंदवलेकर महाराज यांनी पुढे म्हणाले हा मुलगा पुढे साधू होईल आणि कीर्तीमान देखील होईल.

श्री मामा महाराजांचे लग्नाचे वय झाल्यावर त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मागे लग्न करावं असं मागणी केली. त्यावेळी मामा महाराजांना लग्न केले तर आपल्या हातून परमार्थ घडणार नाही म्हणून लग्न न करता रहावे असं त्यांच्या मनात होतं. पुढे ज्ञानेश्वर महाराजांना विचारून ते सांगतील त्या पद्धतीने निर्णय घ्यावा असं पिता-पुत्रांना वाटलं. 
त्यामुळे मामा महाराज हे आळंदीला गेले आणि ज्ञानेश्वर महाराज यांनी जिथे समाधी घेतली आहे तेथील पारावर बसून ज्ञानेश्वरी पारायण त्यांनी चालू केले. ज्ञानेश्वर पारायण चालू केलेले पाहून प्रत्यक्ष समाधी मधून ज्ञानेश्वर महाराज प्रगट झाले आणि त्यांनी मार्गदर्शन केले आई-वडिलांच्या इच्छेप्रमाणे प्रपंच करत परमार्थ करावे. हे करत असताना गुरूंची गाठ पडेल आणि प्रपंच करत परमार्थ पूर्ण होईल. असा आशीर्वाद ज्ञानेश्वर महाराजांनी दिला.

आळंदीच्या न्यानेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने मामा महाराज यांचा विवाह कागवाड येथील फाटक घराण्यामधील ची सौ का रंगूताई यांच्या बरोबर झाला पुढे त्यांचे नाव सौ इंदिरादेवी असं ठेवण्यात आलं.  

इसवी सन 1900 मध्ये सांगलीमध्ये भ.स.तात्यासाहेब महाराज कोटणीस यांनी नित्य कीर्तन चालू केले. यावेळी श्री मामा महाराजांना उपजत असणाऱ्या कीर्तन प्रेमामुळे त्यांनी नित्य कृत्यनिष्ठ असलेल्या तात्यासाहेब महाराज यांच्याकडे अनुग्रह देण्याची याचना केली. यावेळी तात्यासाहेब महाराज यांनी तुमचे पूर्वनियोजित सद्गुरु श्री नारायण महाराज चिमण या गावात आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडून अनुग्रह घ्यावा असं सांगितले त्यामुळे श्री मामा महाराज यांनी 1906 या वर्षी सधन मार्ग समजावून घेत अहोरात्र साधन साधत त्यांचे जीवन अहंकार विरहित करून धन्यता प्राप्त केली.

गुरुआज्ञाप्रमाणे श्री मामा महाराज यांनी 38 वर्ष एक दिवस सुद्धा खंड न पडता अखंडपणे तात्या महाराज यांची सेवा म्हणून कीर्तनसेवा केली. 

श्री मामा महाराज केळकर यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या आज्ञेने नित्य कीर्तनाची परंपरा त्यांचे चिरंजीव श्री दासराम महाराज केळकर यांनी 39 वर्ष वृध्दिंगत केली. आता त्यांची परंपरा त्यांचे जेष्ठ चिरंजीव चंद्रशेखर अण्णा तितक्याच निष्ठेने चालवत आहेत.

टीप:-सदर माहिती ही सोशल मीडिया, इंटरनेट आणि वेबसाईट यांच्या माध्यमातून घेतलेली आहे या माहितीमध्ये काही तफावत आढळल्यास त्यासाठी जीवन मराठी डॉट कॉम जबाबदार नाही.
माहिती संदर्भ: https://dasram. org

केळकर महाराज पुण्यतिथी, सांगली | Death anniversary of Kelkar Maharaj, Sangli 
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या