सांगोल्यातील या मंदिरात एका सिंहासनावर तीन देवता आहेत त्यामधील प्रधान देवता अंबिका(Ambika) देवी म्हणजे अंबाबाई(Ambabai) आहे.
अंबाबाईचे हे मंदिर चौदाव्या शतकातील असावे असे येथील लोकांचे मत आहे. मराठ्यांच्या इतिहासांमध्ये देखील या मंदिराचा उल्लेख असल्याच समजत. ज्यावेळी छत्रपती राजाराम(Chhatrapati Rajaram) यांना केवळ नामधारी करून सत्ता पेशव्यांनी काबुत केली हे सर्व घटना या मंदिरात घडल्याचा दावा येथे केला जातो. मिळालेल्या माहितीनुसार हे मंदिर यादवकाळामधील असून या मंदिरामध्ये प्रथम केवळ अंबिका माता होती नंतर ज्यावेळी मराठ्यांची सत्ता आली तेव्हा येथे तुळजाभवानी मातेची देखील मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे नंतर पेशवे काळामध्ये औंधच्या यमाई मातेची मूर्ती येथे बसवल्याची माहिती मिळते. मात्र इंटरनेटवर मिळालेल्या माहितीनुसार इतिहासकार वरील दाव्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे सांगतात.
इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, माघ शुक्ल सातव्या दिवशी येथे रथसप्तमी(Rathasaptami) दिवशी अंबिका देवीची मोठी यात्रा भरते. पूर्वी या यात्रेला दगडी रथामधून देवीची मिरवणूक काढली जात असे मात्र आता हा रथ उपलब्ध नाही. याची चाके केवळ शिल्लक राहिली आहेत.
श्री अंबाबाई यात्रा 2023 म्हणजे यावर्षी जानेवारी महिन्यातील 27 तारखेला होणार आहे.
Shri Ambabai Yatra 2023 will be held on 27th of January this year.


